धुळ्यात वर्गात साप सोडणाऱ्या व मुलीची छेड काढणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:25 AM2020-01-17T11:25:13+5:302020-01-17T11:25:31+5:30

मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून केली अमलबजावणी

In Dhule, the students who snake in the classroom and abducted the girl were removed from school | धुळ्यात वर्गात साप सोडणाऱ्या व मुलीची छेड काढणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

धुळ्यात वर्गात साप सोडणाऱ्या व मुलीची छेड काढणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : वर्गात साप सोडणाºया दोन विद्यार्थ्यांसह मुलीची छेडखानी काढणाºया एकाला अग्रसेन विद्यालयातून दाखला देत शाळेतून काढण्यात आले़ मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून कारवाई केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली़ दरम्यान कठोर अशा भूमिकेमुळे अन्य विद्यार्थ्यांवर मोठा वचक निर्माण झाला आहे़
साक्री रोडवरील अग्रसेन प्राथमिक विद्यालयातील दोन टवाळखोर नववीच्या विद्यार्थ्यांनी बंद प्लॅस्टिकच्या बरणीतून सर्पमित्र वडिलांनी पकडून आणलेला साप चक्क वर्गात सोडल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली़ घडलेला प्रकार मुख्याध्यापकांपर्यंत पोहचला़ मुख्याध्यापकांनी संबंधित दोघा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेत त्यांनाही हा प्रकार सांगितला.
दरम्यान दोघ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेतून काढून टाका असे सांगितले. त्यानंतर पालकांकडून तसा अर्ज लिहून घेतला. अर्ज प्राप्त होताच मुख्याध्यापक वाघ यांनी त्या दोघ टवाळखोर विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले.
विद्यार्थिनीची छेड काढणाºया विद्यार्थ्याला दाखविला घरचा रस्ता !
तसेच याच शाळेत दुसरी एक घटना घडली आहे़ सातवीच्या विद्यार्थिनीची छेड-नववीचा एक विद्यार्थी काढत होता़ सततच्या जाचाला कंटाळून या विद्यार्थिनीने रौद्ररुप धारण करत छेडखानी करणाºया त्या विद्यार्थ्याला चांगलाच चोप देत खडे बोल सुनावले़ या प्रकारामुळे देखील शाळेत धांदल उडाली होती़ मुख्याध्यापक वाघ यांनी ही बाब गांभिर्याने घेतली़ त्या विद्यार्थ्याच्या पालकाना बोलावून त्याने केलेले गैरवर्तन लक्षात आणून दिले़ त्या विद्यार्थ्याला देखील शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला़ यानंतर घडलेली घटना संस्थेच्या अध्यक्षांना सांगितली असता त्यांनी त्या विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून घेतले़ सर्व विद्यार्थ्यासमोर तिचा सत्कार करीत ५०० रुपयांचे बक्षिसही दिले़ टवाळखोर विद्यार्थ्यांना धडा शिकवत आत्मसंरक्षण करा असा संदेशही दिला़,असे मुख्याध्यापक एऩ सी़ वाघ, प्राथमिक विभागाचे उपमुख्याध्यापक प्रणव कोठवाल यांनी पत्रकान्वये कळविले आहे़

Web Title: In Dhule, the students who snake in the classroom and abducted the girl were removed from school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे