शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: एसटी बँक बॅकफुटवर; दोन हजार रुपये कपातीचा निर्णय मागे !  

By सचिन देव | Updated: October 28, 2023 20:41 IST

Dhule: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाने दोन दिवसांपूर्वी रूपया निधी वर्गणीमध्ये वाढ करून, ती दोन हजार रूपयांपर्यंत केली होती.

- सचिन देव  धुळे  - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाने दोन दिवसांपूर्वी रूपया निधी वर्गणीमध्ये वाढ करून, ती दोन हजार रूपयांपर्यंत केली होती. या निर्णयाला राज्यभरातील एसटी बॅंकेच्या सभासदांनी विरोध दर्शविला होता. तसेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत राज्याच्या सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे एसटी बॅंकेने रूपया निधी वर्गणीतील दर महा दोन हजार रूपये कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत २८ रोजी सायंकाळी पत्र काढून, सभासदांना कळविले आहे. यामुळे राज्यभरातील एसटीच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

एसटी बॅंकेच्या सभासद असलेल्या सभासदांकडुन मासिक वेतनातुन एक विशिष्ट रक्कम कपात करून ती `रूपया निधी ठेव ` योजनेमध्ये जमा केली जाते. या या संचित रक्कमेवर सभासदास वार्षिक त्तत्वावर व्याज दिली जाते. सध्या वेतनाच्या टप्प्यानुसार सदर रक्कम किमान १०० ते ५०० ऐवढी आहे. मात्र, ॲड. गुणरत्न सदावर्तेच्या निवडून आलेल्या संचालक मंडळाने २८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या झालेल्या बैठकीत रूपया निधी वर्गणी किमान २ हजार रूपये करण्याचा ठराव केला होता. या निर्णयामुळे बॅंकेेचे अनेक सभासद थकबाकीमध्ये जाणार होते. तसेच वेतनातील कपातीमुळे कर्मचारी आर्थिक अडचणी येणार होते. त्यामुळे राज्यभरातील बॅंकेचे सभासद असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाल विरोध करून, सभासदांना विश्वासात न घेतल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळाने लागलीच शुक्रवारी सायंकाळी रूपया निधी वर्गणी वाढीचा निर्णय मागे घेत असल्याचे पत्र काढले आहे. दरम्यान, याबाबत `लोकमत ` प्रतिनिधीने बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील, तसेच बॅंकेचे संचालक संतोष राठोड यांच्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 दोन हजार रूपये निधी वसुल करण्याचा संचालक मंडळाचा हा निर्णय बेकायदेशिर व सभासदांवर अन्यायकारक होता. या निर्णयामुळे बहुतांश सभासद थकबाकीदार झाले असते. या बाबत राज्याच्या सहकार आयुक्तांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी दखल घेतल्याने हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. मात्र, नवीन संचालक मंडळाने बेकायदेशिर निर्णय घेण्याचा धडाका लावल्याने, सभासदांमध्ये नाराजी आहे.- संदीप शिंदे अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.

टॅग्स :state transportएसटीDhuleधुळे