आॅनलाइन लोकमतधुळे : गुरूनानक यांच्या ५५० व्या प्रकाश उत्सवाला येथील गुरूद्वारात रविवारपासून अखंड पाठसाहेब पठनाने सुरूवात झालेले आहे. या प्रकाश उत्सवानिमित्त गुरूद्वारात दिवसभर कथा कीर्तन होत आहे. कीर्तनासाठी खास पंजाबमधून सेवेकरी आले आहेत. कथा किर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.या प्रकाश उत्सवाचा १२ रोजी समारोप होणार आहे.गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश उत्सवाला मोठ्या उत्सहाने सुरूवात झालेली आहे. या उत्सवानिमित्त अखंड पाठसाहेबाचे पठन, तसेच कथा कीर्तन होत आहे. कीर्तनासाठी पंजाबमधील अमृतसर व इतर भागातील सेवेकरी आलेले आहेत. सकाळी ६ ते ९ तसेच सायंकाळी ६ ते ९ दरम्यान होणाºया कथा-कीर्तनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.दरम्यान गुरूद्वारामध्ये जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहे. रोज किमान तीन ते साडेतीन हजार भाविक याठिकाणी येत असतात अशी माहिती देण्यात आली.आज मुख्य कार्यक्रमया प्रकाश उत्सवाचा समारोप १२ रोजी होणार आहे. यात सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत कथा कीर्तन होईल. दुपारी १ वाजेपासून लंगर, तर सायंकाळी ६ ते रात्री १२.३० पर्यंत कर्तीन होणार आहे. त्यानंतर १२.३० वाजता आरती होईल, पुष्पवृष्टी होऊन आतषबाजी करण्यात येणार आहे. हा सोहळा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
धुळे येथे प्रकाश उत्सवानिमित्त होणाऱ्या कथा किर्तनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:55 IST