धुळे-मनुदेवी पायी यात्रेत २५० भाविक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:35 AM2019-10-01T11:35:05+5:302019-10-01T11:35:27+5:30

 ११८ किलोमीटरचा प्रवास, यात्रेचे जागोजागी स्वागत

Dhule-Manudevi Period Yatra | धुळे-मनुदेवी पायी यात्रेत २५० भाविक सहभागी

धुळे-मनुदेवी पायी यात्रेत २५० भाविक सहभागी

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत
धुळे : श्री मनुमाता सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या धुळे ते मनुदेवी पायी यात्रेला सोमवारपासून सुरवात झालेली आहे. या पायीयात्रेत जवळपास २५० भाविक सहभागी झालेले आहेत. पायी यात्रेचे हे १६ वे वर्ष असल्याची माहिती संस्थेचे सचिव अजय कासोदेकर यांनी दिली.
सातपुडा निवासिनी कुलस्वामीनी श्री मनुदेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी शेकडो भाविक मोठ्या संख्येने जात असतात. मनुमाता सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ या पदयात्रेचे आयोजन करीत असते.
सोमवारी सकाळी ग्रामदैवत आई एकवीरा देवीचा आशिर्वाद घेऊन या पदयात्रेला सुरवात झाली.
मनुमातेची सवाद्य मिरवणूक शोभायात्रा पांझरा नदी चौपाटीपासून भिडेबाग, सावित्रीबाई फुले चौक, मोठ्या पुलावरून आग्रारोड, पारोळारोड, बाजारसमितीमार्गे काढण्यात आली. त्यानंतर पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली.
या पदयात्रेत २५० ते ३०० भाविक सहभागी झालेले आहेत. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या पदयात्रेत धुळ्यासह मुंबई, पुणे, नाशिक, चाळीसगाव, ठाणे या भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली.
गावोगावी होते स्वागत
या पदयात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात येत असते. त्याचबरोबर पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना ठिकठिकाणी चहा, नाश्ता, भोजनाचीही व्यवस्था करण्यात येत असते. अनेक भाविक या पदयात्रेच्या दिंडीचे दर्शन घेत असतात. दरम्यान मंडळातर्फे पायी दिंडी दरम्यान स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविण्यात येत असतात, असेही अजय कासोदेकर यांनी सांगितले.

Web Title: Dhule-Manudevi Period Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे