आॅनलाइन लोकमतधुळे : ढोलताशांचा निनाद... गुलाल व फुलाची उधळण करीत, व गणपती बाप्पा मोरया.... अशा गगनभेदी घोषणा देत महाराष्टÑाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायांचे सोमवारी गणेश चतुर्थीच्या महूर्तावर आमगन झाले. ‘श्री’च्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली होती. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात येत होती. गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.सोमवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या. जसजशी वेळ वाढत होती, तसतशी उत्तरोत्तर गर्दी वाढत होती. धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुल पर्यंतच्या रस्त्यावर तसेच फुलवाला चौक, जुन्या आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यत रस्त्याच्या दुतर्फा मूर्ती तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती.त्यामुळे या रस्त्यांवर चालायलाही जागा नव्हती. गणेश भक्तांच्या गर्दीमुळे रस्ते फुलून गेले होते.करण्यात आलेले होते. मोठ्या मूर्तींनी लक्षवेधले- राजरंग कॉलनीतील विश्वकर्मा मित्र मंडळ, सहजीवननगरातील जयभोले मित्र मंडळ, आदी मंडळांच्या मूर्ती ट्रॅक्टरवर नेण्यात आल्या. या भव्य मूर्तींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
धुळे जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:46 IST
सकाळपासूनच मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांची गर्दी
धुळे जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन
ठळक मुद्देगणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ फुललीसकाळपासूनच मूर्ती घेण्यासाठी गर्दीमिरवणुकांनी लक्ष वेधले