शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:23 IST

केळीच्या पट्टयातही कापूस लागवडीला प्राधान्य

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस असला तरी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य याच्या मानाने फळपीक व भाजीपाला लागवड तुलनेने खूपच कमी आहे. यावर्षी आतापर्यंत फळपिके १ हजार ३५८.३ तर भाजीपाला ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे केळी, मिरची या पट्यातही आता शेतकरी कापूस लागवडीकडेच जास्त प्रमाणात वळलेले आहे.गेल्यावर्षाचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांपासून धुळे जिल्ह्यात दुुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पाण्याची कमतरता असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिके लागवडीलाच प्राधान्य दिलेले आहे.जिल्ह्यात जवळपास ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. यावर्षी तृणधान्याची १ लाख ३३ हजार ७८२ हेक्टरवर, कडधान्याची २४ हजार ७३० तर गळीत धान्याचे २९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.दरम्यान जिल्ह्यात मोजक्या भागातच पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागातच भाजीपाला व फळपिकांची शेती करण्यात येते.यावर्षी खरीप हंगामात फळ पिकाची अवघ्या १ हजार ३५८.३ हेक्टर क्षेत्रावर लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यात आंबा २१५.५ हेक्टर, केळी ३२४, सीताफळ १२७, कागदी लिंबू ६२.७, मोसंबी ७.५ पपई ४४२ व इतर फळपिके १८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.फळपिकांच्या मानाने भाजीपाल्याची लागवड जास्त आहे. विशेषत: धुळे तालुका व साक्री तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.जिल्ह्यात सर्वाधिक लागवड मिरचीची करण्यात आली आहे. ९९३ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झालेली आहे. त्या खालोखाल कांद्याची लागवड ७८७ हेक्टर, टोमॅटो ३२१, वांगी २०६, कोबी २२१, वाटाणा ४३, व इतर भाजीपाला २ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे