शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 11:42 IST

९ जुलैपासून होणार अंमलबजावणी  : मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे आदेश

ठळक मुद्देगेल्या वर्षापासून जि.प.शाळांची वेळ ९.४५ केली होतीवेळेत बदल करण्याची होती मागणी९ जुलैपासून सकाळी १०.४० वाजता शाळा भरणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करावा अशी शिक्षक संघटनांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केली आहे. आता जि.प. प्राथमिक शाळा एकतास उशिराने म्हणजे सकाळी १०.४५ वाजेपासून भरणार आहे. याची अमलबजावणी ९ जुलैपासून होणार आहे.  शिक्षकांनी या निर्णयाचेस्वागत केले आहे.जिल्ह्यात ११०३ जि.प.च्या शाळा आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळी १०.४५ ते सायंकाळी पाच यावेळेतच भरत होत्या. मात्र जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेले गंगाथरन देवराजन यांनी जि.प.शाळांची वेळ सकाळी ९.४५ ते ४ अशी केली होती. कोणालाही विश्वासात न घेता शाळांची वेळ बदलविण्यात आल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. शाळेची वेळ बदलावी यासाठी  जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने सारखा पाठपुरावा केला होता. तसेच या संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेत शाळांच्या वेळेत बदल करण्याचा ठराव देखील करण्यात आलेला होता. शिक्षक संघटनांची मागणी व सभेने केलेले ठराव लक्षात घेऊन सीईओंनी प्राथमिक शाळेची वेळ बदल करण्यास ५ जुलै रोजी मान्यता दिलेली आहे.  त्याची अमलबजावणी ९ जुलैपासून होणार आहे. बदलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार दरम्यान शाळा सकाळी १०.४० ते सायंकाळी ५.१० यावेळेत भरणार आहे. तर शनिवारी सकाळी ७ ते १०.३० यावेळेत शाळा भरणार आहेत.  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रदीप शिंदे यांनीही शाळा वेळेत बदल झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक