शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

धुळ्यात धूमस्टाईलने मोबाईल चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:50 PM

२१ अ‍ॅन्ड्राईड मोबाईल व दोन दुचाकी जप्त: आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्देदेवपूर पसिररात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होतेपोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केलीआरोपींजवळून २१ अ‍ॅन्ड्रॉईल मोबाईल जप्त

आॅनलाइन लोकमतधुळे : धूमस्टाईलने मोबाईल चोरणाºया चौघांना देवपूर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी अटक केली आहे. त्यांच्याजवळून २१ अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ५५ हजाराचा ऐवज जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे  व  पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी आज देवपूर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.गेल्या काही दिवसात देवपूर भागातून रात्रीच्यावेळी  धूमस्टाईलने मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. तसेच ६ एप्रिल १८ रोजी रात्री १० वाजता लक्ष्मीनगर देवपूर धुळे येथे कल्पेश ठाकूर हे कॉलनी परिसरात अंगणात मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी मध्ये बसलेल्या एकाने ठाकूर यांच्या हातातील ४० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी ९ रोजी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.धूमस्टाईलने मोबाईल चोरीच्या घडलेल्या घटना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी देवपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला या प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पथकाने सापळा रचून अक्षय सुरेश चव्हाण (वय १९, रा. दैठणकरनगर, वाडीभोकर रोड धुळे), दिनेश उत्तम मोहिते (२०, रा. इंदिरानगर, देवपूर धुळे), सुरज बबन ठाकरे (२०, रा. उमाबाई शाळेजवळ, देवपूर धुळे) यांच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींजवळून विविध कंपन्यांचे २१ अ‍ॅन्ड्राईड स्क्रीनटच मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ५५ हजार रूपयांचा माल जप्त केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अकबर पटेल, उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, कैलाप पाटील, चंद्रशेखर नागरे, के. एम. पाटील, कॉन्स्टेबल कबीर शेख, संदीप अहिरे, विनोद अखडमल, प्रवीण थोरात, नरेंद्र शिंदे, शिरीष भामरे यांच्या पथकाने केली.या पथकाचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा