लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : धुळे तालुक्यातील देवभाने येथे ग्रामस्थांनी वानराची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार पार पाडले. तसेच दहा दिवस दुखवटा पाळून दशक्रिया विधी करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला.३० रोजी देवभाने गावात व्याकुळ झालेले वानर आले. कुणी मदत करेल या आशेने अश्रू गाळत होते. वानराची ही स्थिती पाहून राजेंद्र देविदास देसले यांनी पाहिली. त्यानंतर सर्व देसले परिवाराने त्याच्यावर प्रथमोपचार करण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून वानराची सेवा सुशुश्रा केली. तरी वानराचे अश्रू ढाळणे सुरुच होते. पहाता पहाता काही क्षणात या वानराने अखेरचा श्वास घेत प्राण सोडले.या घटनेने देवभाने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त झाली. आणि वानराची अंत्ययात्रा काढून दशक्रिया विधी करण्याचे ठरवले. महिलांसह पुरुष या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण देसले परिवाराने १० दिवसाचा दुखवटा पाळण्याचे ठरविले.
देवभाने येथे वानरावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:48 IST