शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

अनिष्ठ प्रथांना फाटा देण्याचा आदिवासी कोकणी समाज मेळाव्यात निर्धार

By admin | Updated: April 29, 2017 17:45 IST

आदिवासी संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे. मात्र आदिवासी समाजात अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यामुळे हा समाज मागे पडत आहे.

ऑनलाइन लोकमतपिंपळनेर, जि. धुळे, दि. 29 -  आदिवासी संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे. मात्र आदिवासी समाजात अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यामुळे हा समाज मागे पडत आहे. समाजाची प्रगती साधायची असेल, तर अनिष्ठ प्रथा, रुढी व परंपरा यांना फाटा देऊन समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरावी, असा सल्ला माजी खासदार बापू हरि चौरे यांनी दिला.  दरम्यान, 9 मे रोजी रोहोड (ता. साक्री) येथे पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. साक्री तालुक्यातील कुडाशी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आदिवासी कोकणी समाजाचा पहिला मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनिष्ट प्रथांना फाटा देण्याचा निर्धार करण्यात आला. मेळाव्यापूर्वी कुडाशी गावातून रॅली काढण्यात आली.  कोकणी समाज हा आदिवासी संस्कृतीचा कणा आहे. समजाने शिक्षणातून विकास साधण्याची गरज आहे. मुला, मुलींना उच्च शिक्षित केले पाहिजे. समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे जी. आर. कोकणी यांनी सांगितले. आमदार डी. एस. अहिरे म्हणाले, की आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल, तर त्यांच्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. परंतु, या योजनांबाबत त्यांना माहिती नसल्यामुळे शासकीय योजनांचा फायदा आदिवासी बांधवांना घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मेळाव्यात घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय विवाहावर अव्वाचा सव्वा खर्च न करता कमी खर्च करावा, समाजात नव्या प्रथा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, समाजात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रय}शील रहावे, समाजबांधवांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊच नये, आरोग्य बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, समाजातील बांधवांनी कायदा हातात घेऊ नये. तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, असे निर्णय घेण्यात आले.  संघटनेच्या माध्यमातून संस्कृती टिकविण्याचे प्रय}कुडाशी गावात आदिवासी कोकणी समाज संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात 10 ते 15 मुलांची संघटना तयार करून समाजातील निर्माण होणारे प्रश्न व तरुणींवर अत्याचार झाला तर या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करेल, असे सांगण्यात आले. तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा घालविण्यासाठी या संघटनेतील पदाधिकारी काम करणार असून आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी प्रय} केले जाणार आहे. सूत्रसंचालन टी. डी. बहिरम यांनी केले.