लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुलवामा येथील आक्रमण हे पाकिस्तानचे भारताविरूद्धचे छुपे युद्ध आहे. त्याला भारताने चोख उत्तर द्यायला हवे. पाकिस्तानवर आक्रमण हा देशातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकांचा आवाज आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे विसरुन चालणार नाही असे परखड मत गोरक्षक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी व्यक्त केले.येथील मालेगाव रोडवरील गिंदोडीया मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत आमदार राजासिंह बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते़ आमदार राजासिंह म्हणाले, पाकिस्तान हा आजचा अफजलखान असून त्याचा कोथळा काढला नाही, तर भारतावर संकट निश्चित आहे. पंतप्रधान मोदी हे देशप्रेमी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका सर्जिकलने पाकिस्तान सुधारणारा नाही. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नेस्तनाबूत करणे, हेच सैनिकांच्या हौतात्माचे उत्तर ठरेल, असेही आमदार राजासिंह यांनी सांगितले़ आज देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आवश्यकता आहे. महाराजांनी युवकांना एकत्र करून हिंदवी राष्ट्राची स्थापना केली. आजही अशाच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत आपण हिंदु राष्ट्राची शपथ घेत नाही आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करत नाही, तोपर्यंत हिंदूंवरील अत्याचार थांबणारे नाहीत.रागेश्री देशपांडे म्हणाल्या, आजच्या सभेला उपस्थित प्रत्येक हिंदू स्वत:ची जात-पात, पक्ष, संप्रदाय आणि संघटना विसरून केवळ हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी संघटित झाला आहे. आता एकच लक्ष, हिंदु-राष्ट्ऱ असे सांगत त्या म्हणाल्या, आमचा हा शौर्यशाली इतिहास दडपण्याचे षडयंत्र चालू आहे. आज हिंदूंपुढे जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदू नेत्यांच्या हत्या यासारखी संकटे उभी ठाकली आहेत. हिंदु मुलींना धर्मांधांकडून लग्नाचे प्रलोभन दाखवून फसवण्यात येते. या मुलींपासून अपत्ये जन्माला घालून जग इस्लाममय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे रोखण्यासाठी हिंदू युवतींना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला आणि पुरुषांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण, धर्मशिक्षण दिले जात आहे. यामध्ये सर्व हिंदू भगिनींनी सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले़ काश्मीरमध्ये यापुढे सैन्यावर दगडफेक करणाºयांना रबरी गोळ्यांनी नव्हे, तर एके-४७ ने उत्तर द्या. जवानांवर फेकलेल्या प्रत्येक दगडाचे उत्तर गोळीने दिले जाईल, असा संदेश द्यायला हवा. आम्ही केवळ निंदा करतो आणि बदला घेण्याची भाषा करतो; परंतु यांची खोड जिरवण्यासाठी यांच्यावर आक्रमण करणे हाच उपाय आहे. त्यामुळे आता भारताला संरक्षणमंत्र्यांची नाही, तर युद्धमंत्र्यांची आवश्यकता आहे, असे प्रशांत जुवेकर म्हणाले़ प्रारंभी शंखनाद करण्यात आला. व्यासपिठावर सुनील भोलाणेकर, अनिल दीक्षित, एकनाथ भावे यांनी वेदमंत्रपठण केले. सचिन वैद्य यांनी समितीच्या राष्ट्र-धर्म विषयक उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. या सभेचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा कोरेगावकर यांनी केले. पंकज बागुल यांच्यासह अन्य उपस्थित होते़
जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान नेस्तनाबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:38 IST