शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी शरीर सुखाला नकार उपवरासह चौघांविरुध्द गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:16 IST

संशयित शहाद्याचे : मुलीने दाखविली हिम्मत, नोंदविली फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लग्नाआधी शरीर संबंध ठेवण्यात नकार दिल्याच्या राग आल्याने लग्न मोडल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलिसात उपवर मुलासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवर मुलगा हा शहादा येथील राहणार आहे. याप्रकरणी देवपूरमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाºया २१ वर्षीय मुलीने देवपूर पोलिसात सोमवारी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, पीडित तरुणी आणि शहादा येथील  मयूर वसंत चव्हाण यांचे लग्न ठरले होते़ मयूर हा २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने या तरुणीच्या घरी आला़ लग्न जमलेले असल्याने त्याने तिच्या घरी मुक्काम केला़ यानंतर दुसºया दिवशी तरुणीला मोटारसायकलवर बसवून फिरण्यासाठी बाहेर घेवून गेला़ दोंडाईचाजवळ एका हॉटेलवर थांबून त्यांनी चहापाणी घेतले़ यानंतर मयूरने त्या तरुणीला लॉजवर घेऊन जाण्याचा हट्ट धरला़ मात्र, तरुणीने याला नकार दिला़ त्यामुळे त्याने तिला शहादा येथील आपल्या घरी नेले़ घरी देखील त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली़ तिने नकार देताच दोघांमध्ये वाद झाले़ ते वाद विकोपाला गेले़ त्यानंतर लग्न मोडण्याची धमकी त्याने दिली़ या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणी आपल्या घरी परत आली़ शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे मयूर याने आपल्याला मुलगी आवडत नाही़ ती सिगारेट पिते असे खोटे सांगून लग्न मोडले़ तसेच   २ लाखांचा हुंडा मागितला़ तरुणीच्या वडिलांना घरी बोलावून धक्काबुक्की केली़ याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन संशयित मयूर वसंत चव्हाण, वसंत बाबुलाल चव्हाण, पुष्पाबाई वसंत गुरव (सर्व रा़ शहादा, जि़ नंदुरबार) आणि बन्सीलाल बाबुलाल गुरव (रा़ पाटकर नगर, देवपूर) या चौघांविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी