निवेदनात असे म्हटले आहे की, उभरांडी येथील जवळपास ५० ते ६० विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात, परंतु या विद्यार्थ्यांना उभरांडी ते दुसाणे ये-जा करण्यासाठी बससेवा नसल्याने या विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था निवडून शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. म्हणून या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय पाहता व त्यांच्या शिक्षणाचा विचार करता ही बससेवा सकाळी १० वाजता साक्री-निजामपूर-उभरांडीमार्गे दुसाणे व सायंकाळी ५ वाजता दुसाणे-उभरांडीमार्गे साक्री अशी बसची फेरी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी महाविद्यालयाने केली आहे. या निवेदनासोबत शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल व साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळाताई गावित यांचे शिफारस पत्रदेखील जोडण्यात आले आहे. आगार प्रमुखांना निवेदन देतेवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. पी. शेलार, एम. आर. कागणे, डी. यू. पाटील, वरिष्ठ लिपिक अशोक कोळी हे उपस्थित होते.
उभरांडीमार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST