निकालाची प्रतीक्षा
धुळे : कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी वेळेत शाळा सुरू झाल्या नाहीत, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना निकालही वेळेवर मिळणार नाही. दरवर्षी १ मे रोजीच विद्यार्थ्यांना निकालपत्रक दिले जाते. मात्र, यंदा निकालाची प्रतीक्षा आहे.
अवैध धंदे फोफावले
धुळे : लॉकडाऊनच्या काळात अवैध व्यवसाय फोफावलेले आहेत. गुटखा विक्रीला बंदी असताना, चढ्या दराने याची विक्री होत आहे. काळ्याबाजारात मद्याचीही विक्री सुरू आहे. या अवैध धद्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
निर्बंध नावालाच
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यााठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केलेेले आहेत. मात्र, ग्रामीण भागात याचा फज्जा उडालेला दिसतो. ग्रामीण भागात सर्वच दुकाने सुरू आहेत, गर्दीही कमी झालेली दिसून येत नाही.
झुडपे वाढली
धुळे : साक्री रोडवरील हनुमान टेकडी जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात काटेरी आणि इतर झुडपे वाढली असून कचरा साचला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी येतात. स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.