शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली; साक्री तालुक्यात केवळ सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:28 IST

धुळे : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. आता अक्टिव्ह रुग्णांची संख्या ...

धुळे : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. आता अक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या म्हणजेचॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० पेक्षा तर धुळे शहरातील रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी झाली आहे. सर्वात कमी रुग्ण साक्री तालुक्यात आहेत.धुळे शहरात सुरुवातीपासून जास्त रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत मात्र रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. कधी कमी रुग्ण आढळतात तर कधी रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा जास्त होते तसेच पुन्हा कमी होत आहे. आता मात्र ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३४ इतकी झाली आहे. धुळे शहरातील रुग्णदेखील १०० पेक्षा कमी झाले आहेत. धुळे शहरातील ८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.साक्री तालुक्यात सर्वात कमी रुग्णसाक्री तालुक्यात सर्वात कमी बाधित रुग्ण आहेत. साक्री येथील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर शिंदखेडा तालुक्यात ९ रुग्ण आहेत. शिरपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमीजास्त होत आहे.सध्या शिरपूर तालुक्यात ९ रुग्ण आहेत. मागील महिन्यात तालुक्यातील बाधितांची संख्या २ इतकी कमी झाली होती. धुळे तालुक्यातील रुग्णांचे प्रमाण प्रथमच कमी झाले आहे. तालुक्यातील २० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.खासगी रुग्णालयात २० रुग्ण -खासगी रुग्णालयात २० बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७, एसीपीएम महाविद्यालयात ५, तर ७८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तीन जण दाखल असून, ११ बाधित रुग्णांवर इतर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.१२ रुग्णांना तीव्र लक्षणे -सध्या उपचार घेत असलेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र १२ रुग्णांना कोरोनाची तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत. ४७ रुग्णांना सौम्य तर २६ रुग्णांना माध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. ४९ रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत.