दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला प्रवीण गोकुळ माळी (३०) या तरुणाने राहत्या घरात लाकडी सऱ्याला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाइकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना खाली उतरविले. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक बागूल करीत आहेत.
साक्री तालुक्यातील नवागाव सामोडे येथे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमाराला नथ्थू नामदेव भदाणे (६५) या वृद्धाने विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याच दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली असून, तपास हेड काॅन्स्टेबल सोनवणे करीत आहेत.