ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 27 : नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पांडू पोशा वाघमारे (वय 65 रा़ वावधान पो़ मानगाव जि़ रायगड) असे कैद्याचे नाव आह़े तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 19 एप्रिल रोजी त्याची प्रकृती बिघडल्याने नाशिक जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा कारागृह, धुळे येथे मार्गस्थ कैदी म्हणून पाठवून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारात त्याचा मृत्यू झाला़
नाशिक कारागृहातील कैद्याचा मृत्यू
By admin | Updated: April 27, 2017 13:27 IST