लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : धुळे तालुक्यातील दोंदवाड येथे गावातील माकडाचा मृत्यू झाला. म्हणून ग्रामस्थांनी त्याचे अंत्यसंस्कार करुन दशक्रिया विधीही केला. दोंदवाड येथ २३ जून रोजी सदर माकडाचा रोडालगत फिरत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. सदर घटनेनंतर तुकाराम माळी यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी माकडावर अंत्यसंस्कार करुन दहा दिवसाचा दुखवटा पाळला. तसेच २ जून रोजी दहाव्या दिनी सर्व गावातील पुरूष मंडळी यांनी त्यास भाऊबंदकीच्या रिवाजाप्रमाणे केस अर्पण करीत टक्कल केली व दशक्रिया विधी पार पाडला. यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच दशक्रिया विधीनंतर अन्नदानही करण्यात आले.
ेग्रामस्थांनी केला मृत माकडाचा दशक्रिया विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:22 IST