शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सर्जाराजाप्रती कृतज्ञतेचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 18:48 IST

पोळा सण मोठा : कृषी संस्कृतीत बैलांना अत्यंत महत्त्वाचे स्थान अद्याप कायम 

धुळे  :   वर्षभर शेतात कष्ट करणाºया बळीराजाला तेवढ्याच समर्थपणे साथ देणाºया बैलांच्या अर्थात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण होय. या दिवसाला ग्रामीण भागात अपूर्व उत्साह पहावयास मिळतो. आज जरी वेगाने शेतीचे यांत्रिकीकरण होऊ घातले असले तरी अद्यापही बैलांशिवाय शेती करण्याचा विचारच होऊ शकत नाही. त्यावरून बळीराजाच्या या सर्जा-राजांचे महत्त्व अधोरेखीत होते. आणि त्यामुळे या दिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते. पोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांकडून कोणतेही काम करवून घेत नाही. उलट चांगल्या पद्धतीने चारा-पाणी, धान्य, गुळपाणी अशी बडदास्त ठेवतात. दुपारनंतर त्यांच्या शिंगांना रंग लावून, नवे गोंडे, गळत्यात घुंगरमाळा, पाठीवर आकर्षक झुल अशा पद्धतीने त्यांना सजवितात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. तसेच घरी महिला त्याचे पूजन करून त्यास ओवाळतात आणि पुरणपोळीचा नैवेद्यही खाऊ घालतात. यावेळी घरातील सारेच आबालवृद्ध सदस्य एकत्र आलेले असतात. सारेच हा अनुपम सोहळा वर्षभरासाठी डोळ्यात साठवून ठेवत असतात. पोळा सणाच्या दिवशी बैलांची बडदास्त ठेवण्यात येते. त्याला न्हावूमाखू घालून विविध साहित्याने सजविण्यात येते. सवाद्य गावातून मिरविण्यात येते. तसेच त्याचे पूजन करून त्यास नैवैद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालण्याची परंपरा आहे. खान्देशात  ‘बैलपोळा’ म्हणून साजरा होतो पोळा राज्यात इतर प्रांतांसह पोळा खान्देशात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला खान्देशात ‘बैलपोळा’ही म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला राज्यात साजरा होतो तो सण म्हणजे 'पोळा.' खान्देशात बैलपोळा म्हणून ओळख आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. शेतकºयाचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेत त्यांना आंघोळ घालतात. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तºहेने बैल सजविण्यात येते. यासाठी घरातील सर्वच सदस्यांचा हातभार लागतो. प्रत्येकजण सर्जाराजाची सेवा करण्यासाठी आतूर असतो. आणि त्यासाठी हातभार लावत असतो. पोयाचा रे सण मोठा, हाती घेईसन वाट्याशेतकºयाच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्याची वाट पाहतात. तर घरात चुलीवर या लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या सुमारास पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण आनंदाचे वातावरण असते.या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. या दिवशी बैल दारात आल्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पोळा सणावरील कविता आठवते पोयाचा रे सण मोठा, हाती घेईसन वाट्या. आता शेंदूरले घोटा,आता बांधारे तोरण, सजवारे घरदार..’शेतीकामांना दिला जातो ‘ब्रेक’पोळ्याच्या दिवशी शेतातील बैलजोडीच्या माध्यमातून केली जाणारी सर्व कामांना ब्रेक दिला जातो. वर्षाचा सण म्हणून बळीराजा आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना या दिवशी कोणतीही कसर सोडत नाहीत. मजुरांकडून होणारी कामे सुरू असली तरी त्या दिवशी सर्वांनाच पोळा साजरा करायचा असल्याने शेतीकामे सहसा होत नाही. शेतकरी बैलांना घेऊन शेतात जातात. मात्र हातात दोर धरून. दुपारपर्यंत भरपेट चारा खाऊन झाल्यानंतर बैलांना नदी किंवा तलावात नेऊन चांगली आंघोळ घातली जाते. त्यानंतर घरी आणून त्यास सजविण्यात येते. त्यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य लाभते. कोणी शिंगांना रंग लावतो, कोणी घुंगरमाळा बांधतो, कोणी बैलाच्या अंगावर रंगाचे छापे काढतो, असे घरातील सर्व आबालवृद्ध या कामात जुंपले जातात. एकूण पोळा सणामुळे ग्रामीण भागात मोठा उत्साह पहावयास मिळत असतो. 

टॅग्स :Dhuleधुळे