लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री तालुक्यातील माळ माथा भागातील सौर ऊर्जा प्रकल्पाला आज जोरदार वादळ व पावसामुळे मोठा फटका बसला असून अनेक सौर प्लेट निखळून पडले आहेत तर कंट्रोल रूमचे पत्रही उडून गेले आहेत.आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला सौर ऊर्जा प्रकल्पाला आज झालेल्या जोरदार पाऊस व वादळामुळे मोठा फटका बसला आहे पन्नास मेगावॅट क्षमतेच्या या भागाला याचा फटका बसला आहे अनेक सौर ऊर्जा प्लेट पॅनल मधून निघून पडले आहेत तर कंट्रोल रूमचे पत्रही उडून गेले आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वारा व पावसामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे सौर ऊर्जा प्रकल्प कंपनी लावलेल्या सौर प्लेट निघून पडल्याने वा?्याचा वेग किती प्रचंड असेल याची कल्पना येते प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या फ्लॅटचे काचेचे तुकडे मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत.
वादळी पावसामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:12 IST