शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बभळाज नाल्यावरील पुलावरुन क्रुझर कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:55 IST

११ प्रवासी गंभीर : जामनेरकडून पानसेमलकडे जात असताना घडला अपघात

बभळाज : प्रवासी घेऊन जाणारी कु्रझर नाल्याच्या पुलावरुन खाली कोसळली़ यात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति अत्यावस्थ आहे़ ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ गाडी ही वेगात असल्याने वळण रस्त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे़एमएच १५ सीएम ३९९० क्रमांकाची कु्रझर चालक आत्माराम विष्णू बोरसे (रा़ लोणी, फत्तेपूर) याने जामनेर येथील प्रवाश्यांना घेऊन मध्यप्रदेशातील पानसेमल येथे जात होते़ बभळाज गावाच्या पुर्वेस आनंदा महाजन यांच्या शेताजवळील नाल्याच्या पुलाच्या जवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली क्रुझर थेट नाल्यात जावून कोसळली़ या गाडीत ११ प्रवासी बसलेले होते़ ते सर्व जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति चिंताजनक आहे़ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे बभळाज ग्रामस्थ गावातच होते़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ मदत कार्य वेगाने सुरु झाल्याने जखमी झालेल्या प्रवाश्यांना शिरपूर येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तातडीने दाखल करण्याचे काम करण्यात आले़ या अपघातात शिवाजी राजाराम खैरे, विशाखा श्रीकृष्ण सोनवणे, श्रावण सुकदेव ताठे, अमोल भारत बोरसे, रेणुका उत्तम बोरसे, गजानन रघुनाथ जाधव यांच्यासह अन्य प्रवाशांचा समावेश आहे़ दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती़ मदतकार्य वेगाने सुरु आहे़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात