शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

जात प्रमाणपत्रासाठी गर्दी ना मास्क, ना डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 22:25 IST

सामाजिक न्याय भवनातील स्थिती, आवाहन करुनही फरक पडेना

धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांची सध्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात गर्दी होत आहे. अर्ज करण्यासाठी आलेले हे इच्छूक आणि त्यांचे प्रतिनिधी मास्क वापरत नसल्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून आले. धुळ येथील साक्री रोडवरील सामाजिक न्याय भवनात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात निवडणुकीमुळे गर्दी वाढली आहे. अर्ज करण्यासाठी आलेले विद्यार्थी मास्कचा वापर करताना दिसतात. परंतु इतर अर्जदार नियमांचे पालन करताना दिसत नसल्याने चिंता आहे. या बेफिकीरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जिल्हाभरातून अर्जदार येत असल्याने संसर्ग अधिक पसरु शकतो.जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. लेखी सूचना लावल्या आहेत. तसेच वेळोवेळी तोंडी सूचना देखील दिल्या जात आहेत. अधिकारी, कर्मचारींनी सूचना देवून देखील फरक पडत नसल्याचे चित्र आहे.सुदैवाने आदिवासींसाठी नंदुरबारला स्वतंत्र समिती असल्याने धुळ्यात फारशी गर्दी नाही. दिवसभर पंधरा ते वीस जणांची रांग असते. समिती कार्यालयाच्या समोर प्रशस्त जागा असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन शक्य आहे. त्यादृष्टीने समिती प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या अर्जदारांनी काेरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.१२ वी, सीईटीचे विद्यार्थीसामाजिक न्याय विभागात सध्या १२ वी आणि सीईटी उत्तीर्ण विद्यार्थी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्यास येत आहेत. २४ डिसेंबरपर्यंत विद्यार्थींची गर्दी होती. परंतु आता त्यांच्या संख्या कमी झाली आहे. एखाद्या विभागाकडून पत्रव्यवहाराचे अर्ज देखील येत आहेत. विद्यार्थींची फारसी गर्दी नाही. उमेदवारांना प्राधान्यतीन दिवस शासकीय सुटी असली तरी निवडणुकीसाठी समितीचे कार्यालय सुरुच होते. या तीन दिवसात उमदेवारांच्या अर्जांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या समितीकडे इच्छूक उमेदवारांच्या अर्जांचे प्रमाण ९० टक्के आहे. विद्यार्थींचे अर्जे क्वचित प्राप्त होत आहे. सुटीच्या दिवशी विद्यार्थींचे अर्ज स्विकारले नाहीत.प्रशासनातर्फे दक्षताग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे अर्ज करण्याकरिता इच्छूक उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाकडून दक्षता बाळगी जात आहे.रोज २५० अर्जधुळे येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज सरासरी १०० अर्ज प्राप्त होतात. सरासरी ५० प्रमाणपत्र दिले जातात. परंतु सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दररोज सरासरी २५० अर्ज येत आहेत. आतापर्यंत ७५० अर्ज दाखल झाले.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी अर्जदारांना दिल्या जात आहेत. ठिकठिकाणी सूचना फलक देखील लावले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. अर्ज करण्यासाठी आलेले विद्यार्थी मास्क वापरताना दिसतात. परंतु इतर अर्जदारांना मास्क वापरण्याच्या सूचना द्याव्या लागतात. गर्दी टाळण्याची दक्षता घेतली जाते.- नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे.

टॅग्स :Dhuleधुळे