खड्डे बुजवा
धुळे : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजविले नाहीत तर या रस्त्यांची अधिक दुरवस्था होईल.
रस्त्यावर पार्किंग
धुळे : येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमाेर रस्त्यावरच दुचाकी पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा वाहतूक खाेळंबते. काही वेळा अधिकाऱ्यांची वाहनेदेखील अडकतात.
शाैचालय बांधावे
सोनगीर : तालुक्यातील सोनगीर येथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या गावात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक सुलभ शाैचालय नाही. सुलभ शाैचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. त्यामुळे महिलांचे हाल होतात.
ढगाळ वातावरण
धुळे : शहराच्या नभांगणात ढग दाटून आले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस झाला नाही. सायंकाळी तुरळक पावसाचा शिडकाव झाला. काही भागात पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे.