लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्याच्या मागणीला विरोध केला जात होता़ त्यामुळे शिविगाळ व दमदाटी होत असल्यामुळे जैताण्यातील एकाने आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ याप्रकरणी सात जणांविरुध्द संशयावरुन गुन्हा नोंदविण्यात आला़ साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे येथील संजय नगर, मारुती मंदिराजवळ राहणारे शेतकरी हरीश नानाभाऊ बोरसे (२८) यांची पत्नी अश्विनी बोरसे ही तीन महिन्याची गर्भवती आहे़ तिचा गर्भ तपासण्यात यावा आणि मुलगी असल्यास गर्भपात करावा अशी मागणी तिच्यासह काही जणांकडून वेळोवेळी होत होती़ या मागणीला हरीश बोरसे यांचा विरोध होता़ त्यातून त्यांना शिवीगाळ आणि दमदाटीचा प्रकार वेळोवेळी सुरु होता़ सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी तक्रार दाखल केली होती़ त्यानंतरही हा प्रकार सुरु असल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील वाजदरे गावशिवारातील त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली़ याप्रकरणी बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नानाभाऊ गोकूळ बोरसे यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित अश्विनी हरीष बोरसे, अमृत आसाराम मुजगे, ललित अमृत मुजगे, बाळू संशवन पगारे, योगीता बाळू पगारे, गोपाळ अमृत मुजगे, सोनी लाडगे (सर्व रा़ वासखेडी, जैताणे) यांच्याविरोधात भादंवि ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, निजामपूरचे सहायक निरीक्षक खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली़ उपनिरीक्षक सुरवाडे पुढील तपास करीत आहेत़
आत्महत्येस प्रवृत्त केले सात जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 22:01 IST
गळफास घेतला : निजामपूर पोलिसात नोंद
आत्महत्येस प्रवृत्त केले सात जणांविरुध्द गुन्हा
ठळक मुद्देजाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्यासात संशयितांविरुध्द निजामपूरला गुन्हा