कोरोना ‘विषाणूचा’ चा सर्वांनी एकजुटीने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:50 PM2020-03-22T12:50:35+5:302020-03-22T12:55:39+5:30

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क ‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा विषाणु आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

 Corona 'virus' should be united by all | कोरोना ‘विषाणूचा’ चा सर्वांनी एकजुटीने करावा

dhule

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत जनता कर्फ्यू महापालिका कर्मचाºयांच्या रजा देखील रद्दआदेशाचे पालन करून घरातूच काम करा३१ मार्चपर्यत जमाव बंदी लागु थर्मल स्कॅन यंत्राद्वारे शरीरातील तापमानाची तपासणी

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा विषाणु आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कर्फ्यूमध्ये नागरिकांनी एकजुट दाखवित घराबाहेर निघू नका, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना केले़
प्रश्न : कोरोना प्रतिबंधसाठी म्काय उपाय योजना केल्या जात आहे ?
उत्तर : ३१ मार्चपर्यत शासनाने जमाव बंदीचा आदेश लागु केला आहे़ त्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल, बाजारपेठ, यात्रा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे़ नागरिकांनीही आदेशाचे पालन करावे़ मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती करण्याचे कार्य सुरू राहणार आहे़
प्रश्न : सर्वधर्मीयांचे लग्न समारंभ बंद ठेवण्यासाठी काय नियोजन केले?
उत्तर : महापालिका कार्यक्षेत्रातील लॉन्स, हॉटेल तसेच मंगल कार्यालय बंद ठेवण्यासाठी सुचना दिल्या आहेत़ तर मनपाकडून लग्नासाठी परवानगी देणे बंद केले आहे़ मुस्लिम बांधवाचे लग्न या महिन्यात अधिक असल्याने बैठक घेऊन त्यांना देखील रजिस्टर लग्न करण्याचे विनंती केली आहे़ तसेच चर्च, मंदिर, मशिद देखील बंद ठेवण्यात आले आहे़
प्रश्न : रूग्णांची तपासणीसाठी काय नियोजन करण्यात आले आहे?
उत्तर : पुणे व मुंबई व अन्य शहरातून ट्रॅव्हल्सद्वारे धुळ्यात येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून कसुन चौकशी व थर्मल स्कॅन यंत्राद्वारे शरीरातील तापमानाची तपासणी टोल नाक्यावर सकाळी ४ ते सायंकाळी ६ पर्यक केली जात आहे़ कोरोना बाधित संशयित रूग्ण आढळून आल्यास तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़
आपले घरात थांबणे म्हणजे देश हित जोपासणे..
कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यत जमाव बंदी लागु केली आहे़ ही सक्ती नसुन प्रत्येकाची जबाबदारी आहे़ शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय सर्वाच्या हितासाठी आहे़ प्रत्येकाने शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, घरातच थांबा़
प्रशासनाचे आपल्यावर लक्ष
कोरोना विषाणुचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहे़ आदेशाचे पालन करून घरातूच काम करा, सार्वजनिक ठिकाणी फिरू नका, महापालिका कर्मचाºयांच्या रजा देखील रद्द करण्यात आल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़

Web Title:  Corona 'virus' should be united by all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे