शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा अखेर शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 22:23 IST

महापालिका : पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची होती उपस्थिती

धुळे : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी धुळे महानगरपालिका अंतर्गत लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.सदर मोहिमेचा शुभारंभ प्रभात नगर नागरी आरोग्य केंद्र येथे माननीय महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते आयुक्त अजित शेख उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रधानमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सदर लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ साडेदहा वाजता करण्यात आला़ त्यानंतर महापौर यांच्या हस्ते सदर लसीकरण सत्राची उद्घाटन करण्यात आले़ या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख डॉ.पल्लवी रवंदळे डॉ. अर्चना आगळे डॉ. संपदा कुलकर्णी डॉ. रूपाली पाटील डॉ. शिंदे सर हे उपस्थित होते. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत एका लसीकरण सत्राच्या ठिकाणी १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे़ यामध्ये पहिल्या स्तरावरील आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांना शनिवारी लसीकरण करण्यात येणार आहे़ लसीकरण झाल्याबाबत ची नोंद संबंधित कोविन पोर्टल वरती करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच चार आरोग्य कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली असून कोणत्याही लाभार्थ्याला लस दिल्यानंतर काही आरोग्यविषयक तक्रार निर्माण झाल्यास करावयाचे उपाय योजना बद्दलची किट प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच त्याच्या वापराबाबत प्रशिक्षण सुद्धा कर्मचाºयांना देण्यात आलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे