धुळे पंचायत समितीच्या सभेत सेस फंडाच्या मागणीवरुन सभेत वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:59 PM2020-07-04T21:59:48+5:302020-07-04T22:00:10+5:30

संडे अँकर । सदस्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने नाराजी

Controversy in the meeting of Dhule Panchayat Samiti over the demand of cess fund | धुळे पंचायत समितीच्या सभेत सेस फंडाच्या मागणीवरुन सभेत वादंग

धुळे पंचायत समितीच्या सभेत सेस फंडाच्या मागणीवरुन सभेत वादंग

Next

धुळे : पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत सेस फंडावरुन वादळी चर्चा झाली़ सदस्यांना समप्रमाणात निधी मिळायला पाहीजे अशी आग्रही भूमिका सदस्यांनी लावून धरली होती़ यावेळी वीज कंपनीवर देखील आसूड ओढण्यात आले़
येथील पंचायत समितीच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली़ यावेळी सभापती प्रा़ विजय पाटील तर उपसभापती भैय्या पाटील, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे आणि सदस्य, सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते़ सदर सभेत सेस फंडाच्या खर्चाचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. पंढरीनाथ पाटील यांनी सेस फंड प्रत्येक सदस्याला मिळावा, समसमान मिळावा अशी मागणी धरत आक्रमक झाले प्रत्येक सदस्याला सेस फंड मिळाला नाही, न्याय मिळाला नाहीतर सभागृह चालू देणार नाही असा इशाराही यावेळेस दिला. व सभागृह कसे चालवायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंचायत समिती सभापतींच्या निवडणुकी वेळेस काँग्रेस पक्षाने सभापती पदासाठी बिनविरोध होण्यासाठी मोलाची भूमिका घेतली होती़ त्यामुळे सभापती बिनविरोध झाले होते, अशी आठवण त्यांनी करुन दिली.
विद्युत विभागाच्या विविध समस्याबाबत यावेळेस सदस्य आक्रमक झाले़ ज्यात सभापती प्रा़ विजय पाटील देखील आक्रमक झाले व सदर विभागातील विद्युत महामंडळ विभागातील अधिकाऱ्यांना ताकीद देत सर्व समस्या सोडवण्यात यावे असे आदेश दिले तसेच अनेक ठिकाणी उप केंद्राची मागणी होत असून सदर हे उपकेंद्राला मंजुरी देण्यात यावी व पूर्णत्वास करण्यात यावी असे आदेश देखील दिले.
सदस्यांनी मांडले काही महत्वाचे विषय
या सभेत शिक्षण, कृषी, ग्रामपंचायत, लघुसिंचन, बांधकाम, एकात्मिक बाल विकास योजना, आरोग्य विभाग, ग्रामीण पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग, लागवड विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, तालुका कृषी अशा विभागाचे पंचायत समिती सदस्यांच्या विविध समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली़ सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरेही दिली़

Web Title: Controversy in the meeting of Dhule Panchayat Samiti over the demand of cess fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे