शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा नवा ‘फॉर्म्युला’ ठरला अयशस्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:18 IST

धुळे महापालिका निवडणूक : मागच्या तुलनेत उमेदवारांची संख्या घटली, नियोजन चुकलेच

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीतील काँग्रेसचे नियोजन चुकलेआगळा वेगळा नवा फॉर्म्युला ठरला कुचकामीपक्ष पातळीवर आत्मचिंतनाची आवश्यकता

देवेंद्र पाठक धुळे : महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी ‘एक प्रभाग एक चिन्ह’ असा नवा नवा फॉर्म्युला आणला़ फॉर्म्युला अगदीच नवा असला तरी तो अयशस्वी ठरला़ काँग्रेसला अल्प जागात समाधान मानावे लागले़ मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मिळालेल्या जागा लक्षात घेता नियोजन कुठेतरी चुकले असल्याचे स्पष्ट होत आहे़ पक्ष दोन अन् चिन्ह मात्र एकमहापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला आणला गेला होता़ त्यातून मतांची होणारी विभागणी टाळण्याचा कटाक्ष दोन्ही पक्षांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांकडून पाळला जाईल, असे वाटत होते़ ज्या प्रभागात एखाद्या पक्षाचे प्राबल्य असेल त्या ठिकाणी ते चिन्ह घेऊन पक्षाने दिलेला उमेदवार उमेदवारी करणार असे स्पष्ट होते़ त्या उमेदवाराला दोन्ही पक्षांचे सर्वच जण मतभेद विसरुन मदत करणार होते़ याचा अर्थ एका प्रभागात एकाच पक्षाचे चिन्ह घेऊन उमेदवार आपली उमेदवारी देईल़ त्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही आणि मतदारांचा देखील कोणत्याही प्रकारे गोंधळ होणार नाही, असा प्रयत्न पक्षीय पातळीवर होता़ या नव्या अशा फॉर्म्युल्याला स्थानिकच नाही तर राज्य पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता़ पण हा नवा फॉर्म्युला यशस्वी ठरला़ काँग्रेस त्यात अतिशय पिछाडीवरच राहिला असल्याचे स्पष्ट आहे़  बैठकांनी तारलेच नाहीसध्या महापालिकेचे कार्यक्षेत्र वाढले आहे़ ग्रामीणमध्ये आजही काँग्रेसचे प्राबल्य आहे़ त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती़ शहर आणि ग्रामीणमधून सर्वाधिक जागा मिळाल्या तर फायदा दोन्ही पक्षाला मिळेल आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांना होता़ त्यामुळे प्रदेश पातळीवर आघाडीचा निर्णय घेण्यात आला़ याला सर्वानुमते मंजुरी देखील मिळाली होती़ स्थानिक पातळीवर यासंदर्भात काथ्याकूट वेळोवेळी सुरु होता़ त्या बैठकांचे नेमके फलीत आता समोर आले आहे़ उमेदवारीसाठी ओढा, तरीही़़़महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत कितीतरी पटीने इच्छुकांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती़ त्यात स्वत: उमेदवार तर काही ठिकाणी त्यांचे जवळचे नातलग होते़ संबंधितांकडून उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरु असताना मोजक्याच जुन्या चेहºयांना पुन्हा संधी देण्यात आली़ सर्वाधिक नव्या चेहºयांना पसंती देण्यात आल्याचे नावावरुन समोर आले होते़ अनेकांनी काँग्रेसला पसंती दिली असताना मागच्या तुलनेत संख्या वाढेल अशी चिन्हे समोर असताना मात्र निकालावरुन उमटलेले प्रतिबिंब समोर आले आहे़ निष्ठावंतांची होती खदखदमहापालिका निवडणुकीत काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती़ उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काही जणांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती़ यासंदर्भात काही स्थानिक पदाधिकाºयांनी मात्र तोंडावर बोट ठेवणे पसंत केले होते़ पक्षाकडून आलेले निरीक्षक, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, त्यातील सहभागीदारांच्या नावासंदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे झालेली चर्चा आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर घेण्यात आलेला निर्णय, यानंतरच उमेदवारी दिली गेली असल्याचे काही पदाधिकाºयांचे म्हणणे होते़ अशी स्थिती असलीतरी निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप झाला होता़ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा विषय चर्चेचा राहिला़ 

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूक