शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

धुळ्यात भाजपाला एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:36 IST

महापालिका निवडणूक निकाल : राष्टÑवादी - काँग्रेस आघाडी १४, शिवसेना दोन तर आमदार गोटेंच्या लोकसंग्रामला फक्त एक जागा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीत गुंडगिरीसह सर्वच मुद्दे खोटे ठरवत  भाजपने ७४ पैकी ५० जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जादु धुळे महापालिकेतही चालली.   महापालिकेत भाजपचा दुसºयांदा महापौर बसणार. तर राष्टÑवादी आणि काँग्रेस आघाडीने १४ जागा मिळविल्या आहे. शिवसेनेने सात जागांवरस विजय मिळविला. तर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामने एक जागा मिळविली आहे. यंदा धुळे महापालिका निवडणूक ही  विकासाचा मुद्दा सोडून शहरातील वाढत्या गुंडगिरीच्या मुद्यावर लढविली गेली होती. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी या मुद्यावर बंडखोरी करीत लोकसंग्रामकडून ५९ उमेदवार उभे केले होते. यापैकी त्यांचे चिरंजीव तेजस गोटे यांच्यासह एक जागा वगळता सर्वच उमेदवार पराभूत झाले आहे. मात्र त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी प्रभाग पाच मधून भाजपच्या भारती मोरे यांचा पराभव करीत निसटता विजय मिळविला आहे.राष्ट्रवादी - गेल्या १० वर्षापासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्टÑवादीला मोठा फटका बसला आहे.  राष्टÑवादीच्या  मातब्बर उमेदवारांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपने त्यांना उमेदवारी देत राष्टÑवादीच्या सत्तेला सुरुंग लावला होता. त्यामुळे राष्टÑवादी ही फक्त ९ जागांवरच थांबली. महापौर कल्पना महाले या विजयी झाल्यात. काँग्रेस - काँग्रेस पक्षाला  फक्त ५ जागा पक्षाला मिळाल्या. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांचे चिरंजीव प्रितम करनकाळ पराभूत झाले.शिवसेना - निवडणुकीत शिवसेनेला ही फटका बसला आहे. शिवसेनेचे मातब्बर उमेदवार महानगर प्रमुख संजय गुजराथी, महेश मिस्तरी, नरेंद्र परदेशी हे मातब्बर उमेदवार पराभूत झाले आहे. त्यांच्या पक्षाच्या ज्योस्रा पाटील यांनी मात्र  आपली जागा कायम ठेवली. केवळ दोन जागा पक्षाला मिळाल्यात. धुळे महापालिकेत एमआयएमने आपले खाते उघडत दोन जागा मिळविल्या.पक्षीय बलाबलपक्ष    २०१८    २०१३भाजपा    ५0    0३काँग्रेस    0५    0७राष्ट्रवादी    0९    ३४शिवसेना    0२    ११लोकसंगाम    ०१    0१सपा    0२    0३बसपा    ०१    ०१एमआयएम    ०२    00अपक्ष    ०२    १0

टॅग्स :Dhuleधुळे