संकल्प दिनाचा महत्त्वाचा भाग म्हणून धुळे शहरात काँग्रेसने केलेल्या धरणे आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आणून देशाला वाचविणे गरजेचे आहे, अशा आशयाची जोरदार घोषणाबाजी पदाधिकाऱ्यांनी केली.
या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, प्रा. शरद पाटील, नगरसेवक साबीर खान, रमेश श्रीखंडे, गुलाब कोतेकर, भिवसन अहिरे, मुजफ्फर हुसैन, दरबारसिंह गिरासे, हरी चाैधरी, अशोक सुडके, पंढरीनाथ पाटील, जावेद मल्टी, वसीम बारी, बापू खैरनार, सादीक शेख, शोएब पैलवान, अफसर पठाण, शरिफ शेख, प्रकाश शर्मा, असलम सिराज, फैसल अन्सारी, साजीद अन्सारी, दीपक पाटील, बापू नगराळे, सुरेश बैसाणे, शिवाजी अहिरे, रावसाहेब पाटील, गणेश गर्दे, मुख्तार मन्सुरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.