शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात खान्देशस्तरीय काँग्रेस चिंतन शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:52 IST

आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हा : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देसमारोपाच्या शेवटी सहभागी असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिबिरार्थींमध्ये सांघिक चर्चा घडवून आणण्यात आली़ त्यातून येणाºया काळात पक्षाची व आपली दिशा काय असेल? पक्षातून कोणते कार्य केले जाईल, याचा कृती आराखडा तयार करण्यात आला़ त्यातून जिल्हानिहाय  समन्वयकाची नेमणूक करण्यात आली़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चिंतन शिबिरातून उत्तम कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिले जाते़ तर होणाºया चुका नजरेस आणून त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते़ अशा शिबिरामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते़ विरोधकांची आव्हाने परतवून लावण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खान्देशात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत़ मात्र, त्याकरीता कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा प्रत्येक माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे़ असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळ्यात व्यक्त केले़ धुळे तालुक्यातील नकाणे गावाजवळील दुलारी गार्डन येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षांतर्गत राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्यावतीने पंचायती राज कार्यकर्ता चिंतन शिबिर गेल्या दोन दिवसांपासून सुरु होते़ या शिबिराचा समारोप गुरुवारी झाला़ त्यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी  पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी गगनदिप सिंग, विभागीय संयोजक योगेंद्र पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख,  माजी खासदार बापू चौरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन पाटील, कल्पना राजपूत, विलास बिरारीस, रजनिकांत कड, लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डॉ़ दरबारसिंग गिरासे, किरण अहिरराव, बापू खैरनार, शिरीष सोनवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्यासह चिंतन शिबिरात धुळ्यासह नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ माजी मंत्री पाटील म्हणाले, चिंतन शिबीरामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले़ त्यांच्या मनगटात बळ निर्माण करण्याचे काम झाले़ 

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस