शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

शिरपूरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:14 IST

काळजी घेणाऱ्यांची संख्या नगण्य । शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोना विषाणू संसर्गांचा फैलाव अथवा शिरकाव तालुक्यात, जिल्ह्यात होवू नये, यासाठी प्रशासनासोबतच आता नागरीकही काही प्रमाणात काळजी घेवू लागले आहेत़ मात्र त्यांची संख्या अत्यंत नगण्यच राहिली आहे़ शनिवारी शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, संमिश्र चित्र दिसले़शासकीय कार्यालयांत गर्दीला बºयापैकी ओहोटी दिसली़ मात्र अन्य सार्वजनिक ठिकाणची गर्दी अजूनही ओसरलेली दिसत नाही़ विशेष म्हणजे स्वत:ची कोणतीही काळजी न घेता हे नागरीक घोळक्याने गप्पा मारतांना, हस्तांदोलन करतांना, सºर्हास रस्त्यावरच थुंकतांना आढळून आलेत़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन नगरपालिका व आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे़ राज्यातील रूग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असतांना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाय योजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे़ मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही़जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रूग्ण आढळलेला नाही़ मात्र, यामुळे बेफिकीर राहणे परवडणारे नाही, अशाच पध्दतीने प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत़ प्रचंड सतर्कता या आजाराच्या अनुषंगाने बाळगली जात असतांनाही बहुतांश नागरीक मात्र अजूनही याविषयी गंभीर झालेले दिसत नाहीत़शासकीय कार्यालये, बसस्थानक, रूग्णालय, बाजारपेठेत पाहणी केली असता संमिश्र चित्र पहायला मिळाले़ शासकीय कार्यालयांमध्ये नागरीकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली़ तर दुसरीकडे रूग्णालय, बसस्थानक, किराणा दुकानांमध्ये वर्दळ कायम असून त्यातील नागरीकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळून आले़

टॅग्स :Dhuleधुळे