परिणामी दुसऱ्या व्यक्तीवर शेवटचे संस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडत होती म्हणून या कठीण प्रसंगी आपलीही काही तरी जबाबदारी आहे या भावनेतून येथील जय अंबे सप्तशृंगी पदयात्रा मंडळाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन मालपूर येथील अमरधाम परिसराची साफसफाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी आता नवयुवक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी आता येथील विविध ग्रुप हातात झाडु, फावडे घेऊन सज्ज झाले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून जय अंबे ग्रुपच्यावतीने श्रमदान करत येथील अमरधाम परिसराची साफसफाई करून, तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे तर ग्रामपंचायत प्रशासनाने हायमास्ट लम्प प्रज्वलित केल्यामुळे रात्रीच्या वेळीदेखील आता मृतावर अंतिम संस्कार करण्यासाठी गैरसोय दूर झाली आहे.
मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गैरसोय होत होती. येथे मृतसाधन सामग्री आस्ताव्यस्त विखुरुन पडली होती, त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. सामाजिक बांधीलकी जपुन हे काम केल्यामुळे या ग्रुपचे गावात कौतुक केले जात आहे.