याविषयी उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग सुरू आहेत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शासनाने कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही शाळेत सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येते. तसेच गरज नसताना कर्मचाऱ्यांना शाळेत बसवून ठेवले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी संघटना समन्वय समितीचे समन्वयक संजय पवार, भरतसिंग भदोरीया, विजय बोरसे, बी. ए. पाटील, महेश मुळे, देवानंद ठाकूर, वाय. एन. पाटील, ललितसिंग गिरासे, आनंद पवार, आर. व्ही. पाटील, विलास पाटील, एस. डी. मोरे, प्रल्हाद साळुंखे, सी. टी. पाटील आदींनी केली आहे.