न्याहळोद : पशुसंवर्धन व कृषी विभागाने चाऱ्याची टंचाई नसल्याचा अहवाल महसूल विभागाला दिला आहे. चारावर्गीय पिकाच्या झालेल्या पेरणीवरुन हा अहवाल देण्यात आला आहे. मात्र, पशुपालकांनी सांगितले की, पाऊस झाला नसल्याने चारावर्गीय पिकांची वाढच झालेली नाही. त्यामुळे जेमतेम चारा हाती आला आहे. त्यामुळे पुढील नियोजन कसे करावे, याची चिंता आहे.महसूल विभागाने मागविलेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन व कृषी विभागाने पाहणी करून चाऱ्याची टंचाई नसल्याचा अहवाल दिला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ४०० हेक्टर चारावर्गीय पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यातून २७०० मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला. गुरांची संख्या व प्रकार पाहता १७७५ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. म्हणून चारा टंचाई नसल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे.
चारा टंचाई नसल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:54 IST