शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 22:16 IST

१७ पैकी १० जागा जिंकल्या : गावात फटाक्यांची आतषबाजी

निजामपूर : साक्री तालुक्याचे लक्ष लागलेल्या निजामपूर ग्राम पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीने बाजी मारत १७ पैकी १० जागांवर निर्विवाद बहुमत मिळविले़ तर ग्राम विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरस असलेल्या वार्ड क्र ६ मध्ये एका जागेवर स्वतंत्र उमेदवाराने बाजी मारली़ दरम्यान, निजामपूरची निवडणूक कोणत्याही पक्ष्याच्या चिन्हावर लढली गेली नव्हती.गावाच्या विकासाचा मुद्दा दोन्ही पॅनेलने मतदारांपुढे ठेवत प्रचार केला होता़ यंदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार वगळता सर्वच उमेदवार नवीन होते. बाहेरचे कुणीही नेते प्रचारासाठी आले नव्हते. स्थानिक संबंध आणि रुसवे फुगवे मतदारांनी मनात ठेवत मतदान केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मतदार हे शांत होते, त्यांनी कळू न देता मतदान केल्याचे निकालावरुन समोर येत आहे़ यात केवळ चुरस होती ती उमेदवारांमध्येच. विजयाचा दावा बहुतेक सर्व उमेदवार करीत होते. पण निश्चित अंदाज येत नव्हता.विजयी झालेल्या शहर विकास आघाडीचे उमेदवार या प्रमाणे, वार्ड १ मध्ये शाम पवार, जिजाबाई सोनवणे, वार्ड ३ मध्ये महेंद्र वाणी, शितल गजानन शहा, शोभा चिंचोले, वार्ड ४ मध्ये विजय राणे, नीलिमा भार्गव, कविता पवार, वार्ड ६ मध्ये सुरेंद्र विसपुते, सुनीता परदेशी असे १० उमेदवार विजयी झाले आहेत़ग्राम विकास पॅनलने वार्ड २ आणि ५ मधील सर्व जागा म्हणजे ६ पैकी ६ जागा पटकावल्या आहेत. त्यात वार्ड २ मध्ये मुस्ताकखान पठाण, सोनाली चौधरी, सपना मोरे़ वार्ड ५ मध्ये पुष्पांजली बच्छाव, रमेश कांबळे, ताहीरबेग मिर्झा विजयी झाले आहेत़वार्ड ६ मध्ये नामाप्र जागेवर अत्यंत चुरशीची लढत उभी ठाकली होती. शहर विकास आघाडीतर्फे वासुदेव दत्तात्रय बदामे तर स्वतंत्र उमेदवार परेश चंद्रकांत वाणी यांच्यात अत्यंत काट्यची टक्कर झाली. पण बाजी स्वतंत्र उमेदवार परेश वाणी यांनी मारली व ते विजयी झाले. शहर विकास आघाडी तर्फे गड आला पण सिंह गेला अश्या घोषणा सोशल मीडिया वर व्हायरल झाल्या. ढोल ताश्यांच्या गजरात फटाके फोडत काढलेल्या मिरवणुकीत गुलाल उधळत ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मतदारांचे घरोघरी जाऊन आभार मानले़ शहर विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी जेष्ठ नेते शरद शाह यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे