धुळे : स्पिरीटसदृश रसायनाची बेकायदेशीरपणे चोरटी वाहतूक करणाºया तरुणास शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले़ त्याच्याकडून २५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे़ मद्य बनविण्याकामी उपयोगात येणारे स्पिरीट सदृश रसायन हे चोरटी विक्री करण्याच्या हेतूने गैरकायदेशीरित्या एका तरुणाने बाळगल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील पळासनेर गाठले़ मिळालेल्या माहितीनुसार गावात वॉच ठेवून दीपक बन्सीलाल शिरसाठ (२५, रा़ पळासनेर, ता़ शिरपूर) याला ताब्यात घेतले़ ही घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने बेकायदेशीर बाळगलेले स्पिरीटसदृश रसायन काढून दिले़ त्याचे बाजारमूल्य २५ हजार ८०० रुपये एवढे आहे़
स्पिरीटसदृश रसायन पळासनेरला केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:39 IST