शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील बाहुबली नगरात दिवसा चेनस्रॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:55 IST

वृध्द महिलेची फिर्याद : ४५ हजाराचा मुद्देमाल

ठळक मुद्देभरदिवसा घडली ही घटनामहिलेने आरडा ओरड करुनही उपयोग शुन्यक्षणार्धात बसला ४५ हजाराचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पत्ता विचारण्याचा बहाणा करत दोघां भामट्यापैकी एकाने वृध्द महिलेची सोनपोत ओरबडून पोबारा केल्याची घटना साक्री रोडवरील बाहुबली नगरात सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात दुपारी फिर्याद दाखल झाली़ साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मागे बाहुबली नगर प्लॉट नंबर ६६ मध्ये जयश्री अशोक दुसाने (६७) हे आपल्या परिवारासोबत राहतात़ सकाळची वेळ असल्यामुळे घरातील साफसफाई केल्यानंतर जमा झालेला कचरा कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या बादलीत टाकण्यासाठी ही महिला घराबाहेर आली होती़ कंपाऊंडला कुलूप लावलेले होते़ बाहेर दोन जण दुचाकी घेऊन उभे होते़ त्यातील एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करत कंपाऊंडजवळ येऊन वृध्द महिलेला हाका मारु लागला़ कागदाचा तुकडा त्या महिलेच्या हातात दिल्यानंतर नजर चुकवून गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीची सोनपोत ओरबडून दोघांनी पोबारा केला़ या घटनेनंतर वृध्द महिलेने आरडा-ओरड केला, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही़ याप्रकरणी त्या वृध्द महिलेने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार दोघा भामट्यांविरुध्द भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा