शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

विविध प्रात्याक्षिकांद्वारे योग दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:07 IST

आंतरराष्टÑीय योग दिवस : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घरातच करण्यात आली प्रात्याक्षिके, ताणतणाव यावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरासह जिल्ह्यात जागतिक योग दिवस घरीच साजरा करण्यात आला. आॅनलाइनद्वारे झालेल्या मार्गदर्शनानुसार नागरिकांनी घरीच विविध योगासने केलीत.यासह काही ठिकाणी आॅनलाइन वेबिनार, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर हजारोंच्या उपस्थित जागतिक योग दिवस साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाची महामारी सुरू असल्याने, नागरिकांनी घरीच थांबून योग दिवस साजरा केला.धुळेपतंजली योग समिती, धुळे, भारत स्वाभिमान न्यास, युवा भारत, किसान सेवा व महिला पतंजली समितीतर्फे यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने फेसबुक लाईव्ह माध्यमातून आंतरराष्टÑीय योग दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षक डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ९१ वर्षाच्या मोरे बाबांसह मोतिसिंग ठाकुर, अरुण विभांडीक, प्राचार्य एस. टी. चौधरी व मुरलिधर पांडे या सत्तर वषार्पेक्षा जास्त वय असणाऱ्या वयोवृद्धांनी विविध योगासने, व्यायाम आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिके दाखवून प्रेक्षकांना थक्क करुन सोडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतंजलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र निकुंभ, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष प्रितमसिंग ठाकुर, युवा प्रभारी जितेंद्र शेटे, किसान सेवा समितीचे योगेश अत्रेय, अर्चना शिंदे, पुष्पाताई ठाकुर, संध्याताई पाटील, किशोर गुरव आणि अन्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलयेथील एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूलच्या वतीने २१ रोजी आॅनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात इयत्ता तिसरी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता ७ वीच्या रुही रैदासने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता ७ वीच्या भव्य जैन याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले. क्रीडाशिक्षक दीपक मनोरे यांनी विद्यार्थ्यांना ओमकार साधना, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, धनुरासन, पद्मासन, भद्रासन, गोमुखासन असे योगासनाचे विविध प्रकार शिकविले. मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी मार्गदर्शन केले.पंक्ती मोमया, स्नेहा सैनी, सना देशमुख, अमित कुमार, यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.तंत्रनिकेतन महाविद्यालयबापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे जेष्ठ प्रशिक्षक व योग शिक्षक सतिश लोहालेकर व सचिन लोंढे यांनी योगाभ्यासाचे विविध प्रकार, विविध योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार सर्वांकडून प्रात्यक्षिकांसह करुन घेतले. त्यांनी ध्यान धारणा व नियमित योगासने करणे उत्तम स्वास्थ्य्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रमोद कचवे, यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. क्रिडा संचालक प्रा योगेश रवंदळे यांनी प्रास्ताविक केले.गुड मॉर्निंग ग्रुपगुड मॉर्निंग ग्रुपतर्फे पांजरा नदी चौपाटीवर योग दिन साजरा करण्यात आला.कोरोना प्रादुभार्वाची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून ९१ वर्षीय योगशिक्षक पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. , प्राणायाम, कपालभाती, सूर्यनमस्कार तसेच अन्य योगा प्रकार करण्यात आले. यावेळी ओम प्रकाश खंडेलवाल, मनोज वाघ, नैनेश साळुंके, नंदू कुलकर्णी, कैलास मासुळे, रमेश सावंत, महेंद्र लगडे, प्रदीप चव्हाण, सचिन अग्रवाल , लक्ष्मणराव घाटोळे, यश देवरे ओम वाघ भीमराव जगदाळे चिराग पाटील आदी उपस्थित होते.साक्रीआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येकाने कोरोना काळात घरीच राहून योगासन व प्राणायाम करून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून सुदृढ आयुष्याचा मंत्र आत्मसात करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांच्या आदेशानुसार साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयात आयोजित ‘आॅनलाईन योग’उपक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ‘योगा अ‍ॅट होम, अ‍ॅन्ड योगा विथ फॅमिली’ या संकल्पनेअंतर्गत सदर आॅनलाईन योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात योगशिक्षक प्रा.सुनील पालखे यांनी प्रार्थने पासून केली. त्यानंतर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. हसीन तडवी यांनी विविध योगासने व योगशिक्षक डॉ.प्रीतम तोरवणे यांनी विविध प्राणायामाचे सकृती माहिती व प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ संजय सोनवणे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, व आयक्यूएसी प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.खर्दे (ता.शिरपूर)जागतिक योग दिनानिमित्त तालुक्यातील खर्दे बु. येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आॅनलाईन योग दिन साजरा केला.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या योगा सत्रात सहभागी होऊन सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत च्या काळात योग दिन साजरा करून योगासनाचे विविध प्रकार केले.योगशिक्षक व्ही.ई.सिसोदे यांनी सर्वांना योगासनाचे प्रकार करून दाखवून माहिती सांगितली. योगासन संपल्यानंतर प्राचार्य व्ही. आर. सुतार यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्याध्यापक विजय सुतार यांनी कौतुक केले.

टॅग्स :Dhuleधुळे