विविध प्रात्याक्षिकांद्वारे योग दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:07 PM2020-06-22T13:07:12+5:302020-06-22T13:07:41+5:30

आंतरराष्टÑीय योग दिवस : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घरातच करण्यात आली प्रात्याक्षिके, ताणतणाव यावर मार्गदर्शन

Celebrate Yoga Day with various demonstrations | विविध प्रात्याक्षिकांद्वारे योग दिवस साजरा

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरासह जिल्ह्यात जागतिक योग दिवस घरीच साजरा करण्यात आला. आॅनलाइनद्वारे झालेल्या मार्गदर्शनानुसार नागरिकांनी घरीच विविध योगासने केलीत.यासह काही ठिकाणी आॅनलाइन वेबिनार, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर हजारोंच्या उपस्थित जागतिक योग दिवस साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाची महामारी सुरू असल्याने, नागरिकांनी घरीच थांबून योग दिवस साजरा केला.
धुळे
पतंजली योग समिती, धुळे, भारत स्वाभिमान न्यास, युवा भारत, किसान सेवा व महिला पतंजली समितीतर्फे यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने फेसबुक लाईव्ह माध्यमातून आंतरराष्टÑीय योग दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षक डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ९१ वर्षाच्या मोरे बाबांसह मोतिसिंग ठाकुर, अरुण विभांडीक, प्राचार्य एस. टी. चौधरी व मुरलिधर पांडे या सत्तर वषार्पेक्षा जास्त वय असणाऱ्या वयोवृद्धांनी विविध योगासने, व्यायाम आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिके दाखवून प्रेक्षकांना थक्क करुन सोडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतंजलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र निकुंभ, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष प्रितमसिंग ठाकुर, युवा प्रभारी जितेंद्र शेटे, किसान सेवा समितीचे योगेश अत्रेय, अर्चना शिंदे, पुष्पाताई ठाकुर, संध्याताई पाटील, किशोर गुरव आणि अन्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
एसव्हीकेएम सीबीएसई स्कूल
येथील एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूलच्या वतीने २१ रोजी आॅनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता तिसरी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता ७ वीच्या रुही रैदासने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता ७ वीच्या भव्य जैन याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले. क्रीडाशिक्षक दीपक मनोरे यांनी विद्यार्थ्यांना ओमकार साधना, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, धनुरासन, पद्मासन, भद्रासन, गोमुखासन असे योगासनाचे विविध प्रकार शिकविले. मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी मार्गदर्शन केले.पंक्ती मोमया, स्नेहा सैनी, सना देशमुख, अमित कुमार, यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
तंत्रनिकेतन महाविद्यालय
बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे जेष्ठ प्रशिक्षक व योग शिक्षक सतिश लोहालेकर व सचिन लोंढे यांनी योगाभ्यासाचे विविध प्रकार, विविध योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार सर्वांकडून प्रात्यक्षिकांसह करुन घेतले. त्यांनी ध्यान धारणा व नियमित योगासने करणे उत्तम स्वास्थ्य्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रमोद कचवे, यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. क्रिडा संचालक प्रा योगेश रवंदळे यांनी प्रास्ताविक केले.
गुड मॉर्निंग ग्रुप
गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे पांजरा नदी चौपाटीवर योग दिन साजरा करण्यात आला.कोरोना प्रादुभार्वाची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून ९१ वर्षीय योगशिक्षक पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. , प्राणायाम, कपालभाती, सूर्यनमस्कार तसेच अन्य योगा प्रकार करण्यात आले. यावेळी ओम प्रकाश खंडेलवाल, मनोज वाघ, नैनेश साळुंके, नंदू कुलकर्णी, कैलास मासुळे, रमेश सावंत, महेंद्र लगडे, प्रदीप चव्हाण, सचिन अग्रवाल , लक्ष्मणराव घाटोळे, यश देवरे ओम वाघ भीमराव जगदाळे चिराग पाटील आदी उपस्थित होते.
साक्री
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येकाने कोरोना काळात घरीच राहून योगासन व प्राणायाम करून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून सुदृढ आयुष्याचा मंत्र आत्मसात करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांच्या आदेशानुसार साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयात आयोजित ‘आॅनलाईन योग’उपक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ‘योगा अ‍ॅट होम, अ‍ॅन्ड योगा विथ फॅमिली’ या संकल्पनेअंतर्गत सदर आॅनलाईन योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात योगशिक्षक प्रा.सुनील पालखे यांनी प्रार्थने पासून केली. त्यानंतर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. हसीन तडवी यांनी विविध योगासने व योगशिक्षक डॉ.प्रीतम तोरवणे यांनी विविध प्राणायामाचे सकृती माहिती व प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ संजय सोनवणे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, व आयक्यूएसी प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
खर्दे (ता.शिरपूर)
जागतिक योग दिनानिमित्त तालुक्यातील खर्दे बु. येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आॅनलाईन योग दिन साजरा केला.
विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या योगा सत्रात सहभागी होऊन सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत च्या काळात योग दिन साजरा करून योगासनाचे विविध प्रकार केले.योगशिक्षक व्ही.ई.सिसोदे यांनी सर्वांना योगासनाचे प्रकार करून दाखवून माहिती सांगितली. योगासन संपल्यानंतर प्राचार्य व्ही. आर. सुतार यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्याध्यापक विजय सुतार यांनी कौतुक केले.

Web Title: Celebrate Yoga Day with various demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे