दोंडाईचा - येथे आमदार जयकुमार रावल, लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब रावल कला, क्रीडा संकुलात योग शिबिर घेण्यात आले . शिबिराचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, उपमुख्यधिकारी हर्षल भामरे यांनी केले. शिबिरात डॉ. विभा इंदाणी यांनी योगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील उपस्थित होते; तर कार्यक्रमास दोंडाईचा शहरातील नगरसेवक, राकेश अग्रवाल, श्रीकांत सराफ, कवडीवा, छोटू ढोले, नगरपालिका कर्मचारी सहभागी झाले होते.
रवी अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दोंडाईचा नगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य निरीक्षक शरद महाजन व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.