शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गावठी हातभट्टीचा दारुअड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:29 IST

थाळनेर शिवार : एका तरुणाला घेतले ताब्यात

धुळे : थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी सुरु असलेला गावठी हातभट्टीचा दारुअड्डा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला़ २७ हजार २७० रुपयांची दारुसाठी नायनाटही करण्यात आला असून एका तरुणाला अटक केली आहे़शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी एकनाथ जमादार यांच्या शेतापासून काही अंतरावर सार्वजनिक जागी झाडाझुडूपांमध्ये गावठी हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती थाळनेर पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एऩ ए़ रसाळ, पोलीस कर्मचारी विजय जाधव, प्रकाश मालचे, सिराज खाटीक, सरला जाधव, होमगार्ड मुकेश कोळी, आकाश सूर्यवंशी, अमोल ढिवरे यांच्या पथकाने सापळा रचला़ माहिती मिळालेल्या ठिकाणी शिताफिने जावून छापा टाकण्यात आला़ झाडाझुडूपांमध्ये प्लॅस्टिकचे ड्रम ठेवलेले होते़ एक जण चार दगडांनी मांडलेल्या चुलीजवळ बसलेला होता़ चुलीवर कच्चे रसायनाने भरलेले पत्रटी ड्रम, त्यावर मातीच्या भांड्यामध्ये स्टीलची प्लेट, प्लेटला स्टीलची नळी जोडलेली त्यावर जर्मनी पातेले मांडलेले होते़ मातीच्या भांड्यास दारु गाळण्यासाठी मध्यभागी स्टीलच्या प्लेटला लावलेल्या नळीद्वारे दारु प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये गाळली जात असताना पोलिसांनी छापा टाकला़  पोलिसांनी सर्व साहित्य मिळून २७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्याची जागेवरच विल्हेवाटही लावली़ याप्रकरणी संशयित राजेंद्र हरचंद शिरसाठ (३५, रा़ पूरग्रस्त कॉलनी, थाळनेर ता़ शिरपूर) या तरुणाला अटक करण्यात आली़ प्रकाश मालचे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी