शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

गुरे मोकाट तर ‘मालक’ जाणार आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:11 IST

महापालिका : पोलिसांच्या मदतीने मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल होणार

धुुळे : आता महापालिकेने रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे पकडण्यासाठी अडीच लाखांचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे़ ठेकेदाराकडून जप्त केलेली जनावरे गो-शाळेत संगोपनासाठी पाठविण्यात येईल. ही जनावरे रस्त्यावर मोकाट सोडणाºया मालकाकडून गुरांच्या संगोपनाचा खर्च दंड म्हणून वसूूल करण्यात येईल. तसेच मोकाट जनावरासंदर्भात नोटीस बजावूनही जर जनावरांच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्याविरोधात या कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तीन महिन्याची जेलची हवा खावी लागणार आहे. याशिवाय तीन हजाराचा दंड ठोठविण्याची तरतूद ही करण्यात आली आहे.दोनशे चौकात दोन हजार गुरेपाच कंदील चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक, आग्रारोड, फाशीपुल, मनपाच्या जुन्या इमारतीजवळ, दत्त मंदिर चौक, अग्रसेन महाराज चौक, बारा पत्थर, पारोळा चौफुली अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात पाच ते सहा जनावरे ठ्यिा मारून बसतात़ शहरातील दोनशे चौकात अंदाजे दोन हजार जनावरांचा मुक्तपणे संचार आहे़अशी होणार आता कारवाईशहरात सर्रासपणे मोकाट जनावरे सोडली जातात़ त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होत असल्याने मनपा व वाहतूक शाखेतर्फे मुंबई पोलिस कायद्याच्या कलम ९० अ, ११८ नुसार गुरांच्या मालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे़जनावरे जप्त केली जाणारजनावरे मोकाट सोडून देणाºया मालकांवर दंड व फौजदारी कारवाई केली जाणार आहेत. लवकरच रस्यावर फिरणारी मोकाट जनावरे पकडली जाणार आहे़ जप्त केलेली जनावरे पांजरापोळ किंवा इतर खाजगी गोशाळा ठेवण्यात येणार आहे़ मालकास आपले जनावर पुन्हा मिळावे यासाठी मनपाचा दंडासह प्रती जनावरे ३५० रुपये गोशाळेस प्रतिदिन द्यावे लागणार आहे. दरम्यान जनावर मृत झाल्यास पालिका अथवा गोशाळा जबाबदार राहणार नाही. तसेच २१ दिवसांच्या आत जनावर परत न नेल्यास त्याची मालकी पांजरापोळ संस्थेस दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे़कोंडीचा प्रश्न सुटेलशहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो़ रस्त्यावर अचानकपणे जणावरे रस्ता ओलांडतात असल्याने अपघात होतात़ मनपाच्या या निर्णयांनतर अपघात व वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटू शकणारा आहे़पोलीसांना दिली जाणार माहितीनवनियुक्त आयुक्त अजिज शेख यांनी गुरांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तातडीची बैठक घेवून रस्त्यावर गुरे सोडणाºया मालकांना वारवांर नोटीस बजावून देखील दखल न घेणाºया मालकांवर मनपा अधिनियमानुसार कारवाई करण्याचा आदेश मनपाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे़ त्यानुसार आता पोलिस प्रशासनाची मदत घेऊन मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे़ई निविदेतून जप्तीचा ठेकाविधानसभा आचार संहितेपूर्वी मनपाने अकरा महिन्यासाठी अडीच लाखांची तात्पुती निविदा काढली आहे़ निविदा घेणारी संस्था किंवा ठेकेदाराला शहरातील मोकाट जनावरे (गाय, म्हैस, बैल ) पकडून खाजगी गो-शाळेकडे जमा करावी लागणार आहे़ आचार संहितेनंतर कारवाईसाठी स्वंतत्र पथक नियुक्त करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे