जात प्रमाणपत्रासाठी लागतात फक्त ५७ रुपये संजय गायकवाड : ... तर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:59+5:302021-07-12T04:22:59+5:30

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शासन नियमाप्रमाणे निश्चित केलेल्या दराबाबत केंद्राच्या दर्शनी भागावर नागरिकांना दिसेल, अशा ठिकाणी दर ...

Caste certificate costs only Rs 57 Sanjay Gaikwad: ... then action will be taken | जात प्रमाणपत्रासाठी लागतात फक्त ५७ रुपये संजय गायकवाड : ... तर होणार कारवाई

जात प्रमाणपत्रासाठी लागतात फक्त ५७ रुपये संजय गायकवाड : ... तर होणार कारवाई

Next

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शासन नियमाप्रमाणे निश्चित केलेल्या दराबाबत केंद्राच्या दर्शनी भागावर नागरिकांना दिसेल, अशा ठिकाणी दर फलक लावावेत. जास्त दर आकारल्यास केंद्रदेखील रद्द करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

आधार नोंदणीचे दर असे

नवीन आधार नोंदणी करणे- नि:शुल्क. बाल आधार पाच वर्षानंतर अद्ययावत करणे (अनिवार्य), हाताचे ठसे, डोळ्याचे बुबुळांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे – निशुल्क. सर्वसामान्य नागरिकांचे आधार डेमोग्राफिक / बायोमेट्रिक अपडेट करणे, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासह हाताचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे- १०० रुपये. सर्व सामान्य नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांकासह डेमोग्राफिक अपडेशन करणे- ५० रुपये. ई-आधार डाऊनलाड करून कलर प्रिंट देणे- ३० रुपये.

नागरिकांनी आधार अपडेशनकरिता जास्त रकमेची आकारणी करणाऱ्या केंद्र चालकाविरुद्धची तक्रार संबंधित तहसीलदार किंवा शहरी भागात आयुक्त महानगरपालिका/ मुख्य अधिकारी नगर परिषद यांच्याकडे करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

सामान्यांचा प्रश्न...

आधार कार्ड तसेच प्रमाणपत्रांच्या दराबाबत नागरिक नेहमीच तोंडी तक्रारी करतात. काही सेवा केंद्र चालक अधिक रक्कम वसूल करीत होते. अशात प्रशासनाने दर जाहीर केल्याने सामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे. आता आळा बसेल, अशी आशा आहे.

विविध दाखले किंवा आधार कार्डसाठी आपले सरकार सेवा केंद्रचालक जादा दर आकारत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी. चाैकशीअंती त्वरित कारवाई केली जाईल.- संजय गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, धुळे

Web Title: Caste certificate costs only Rs 57 Sanjay Gaikwad: ... then action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.