धुळे : धुळे येथील शेख कुटूंब अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे लग्न जुळविण्यासाठी जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा शहराजवळ ट्रकच्या धडकेत इंडिका कारमधील मुलीसह चालक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली. दरम्यान, घटनेतील भिषणता एवढी होती की, चालकाला कारचा काही भाग कापून बाहेर काढावे लागले़ राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नांदुरा-मलकापूर रोडवरील प्रियंका हॉटेलजवळ मलकापूरकडे जाणाºया (एमएच २७ बीएक्स ५९९५) या क्रमाकांच्या ट्रकने समोरून येणाºया (एमएच ४० एसी ५३८०) या कारला जबर धडक दिली. या अपघातात कारमधील चालक साबीर सलीम अन्सारी याच्यासह ११ वर्षीय मुलगी शिफा अख्तर अन्सारी हे दोघे जागीच ठार झाले. तर रुबीनाबी शेख अख्तर (३२), सुमिया साबीर (३५), जावेद अख्तर (१४), सोनू अख्तर (१७) व इतर तीन जखमी झाले. यापैकी सोनू अख्तर व इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ घटनेतील शेख कुटूंबिय हे धुळे येथील जाममोहल्लामधील रहिवाशी असून ते मुर्तीजापूर येथे सोयरिकसाठी जात होते. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश असून एकास खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
नांदुराजवळील ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:45 IST
मुलीसह चालक जागीच ठार, धुळे येथील कुटूंबियावर काळाची झडप
नांदुराजवळील ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नांदुरा-मलकापूर रोडवर अपघातधुळे येथील शेख कुटूंबियावर काळाची झडपचालकासह ११ वर्षीय चिमुरडीचा करुण अंत