लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणाºया कारने झाडाला जोरदार धडक दिली़ या अपघातात कार फेकली गेल्याने चार जणांना जबर दुखापत झाली़ त्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी थाळनेर पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे़ शिरपूरकडून चोपडा गावाकडे जाणाºया रोडवर भोरखेडा गाव आहे़ या गावानजिक एमएच ०६ एएस ४४५५ क्रमांकाची कार शिरपूरकडून चोपडाकडे जात होती़ कार वेगात असल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भोरखेडा गावाजवळील एका झाडाला या भरधाव वेगाने येणाºया कारने जोरदार धडक दिली़ धडक इतकी जबरदस्त होती की, झाडाचे तर नुकसान झाले शिवाय कार देखील उलट दिशेने बºयाच अंतरापर्यंत फेकली गेली़ या अपघातात जगदीश तुकाराम जाधव (५५), मोहन तुकाराम जाधव (४८), उर्मिला जगदीश जाधव (५०) आणि अनिता मोहन जाधव (४२) (सर्व रा़ पानसेमल जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या चौघांना दुखापत झाली आहे़ यातील जगदीश जाधव आणि मोहन जाधव यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ तर उर्वरीत दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी मनोज सुरेश चित्रकथी यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता थाळनेर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ घटनेचा पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत़
भोरखेडाजवळील कारने दिली झाडाला धडक, २ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:25 IST
अपघातात दोन जण जखमी : घटनास्थळी बघ्यांची गर्दी, पोलीस दाखल
भोरखेडाजवळील कारने दिली झाडाला धडक, २ ठार
ठळक मुद्देभरधाव कारमुळे नियंत्रण सुटलेझाडाला दिली धडक