शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुकवद येथे बिबट्या कॅमेºयात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 17:55 IST

ग्रामस्थांमध्ये दहशत : ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

ठळक मुद्देयेथील परिसरात असलेला बिबट्या हा सायंकाळी व पहाटे अशा  दोन वेळा भक्षाच्या शोधात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापार्श्वभूमीवर वनविभागाचे वनक्षेत्रपाल के. वाय. माने, वनपाल आर. ई. पाटील यांनी शेतकºयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावात कोणीही एकटे फिरू नये, तसेच घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन तिला घुंगरू बांधावेत, असे सांगण्यात आले आहे.  दरम्यान, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा  :  तालुक्यातील सुकवद येथे गेल्या एक महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. पुन्हा एकदा येथील परिसरात बिबट्याचा संचार असल्याची बाब समोर आली. येथील परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमºयात  शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे. दरम्यान, वनविभागाने येथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुकवद येथील आण्णा पाटील यांच्यावर १ एप्रिल रोजी मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या दिवसांपासून वन विभागाने या ठिकाणी कॅमेरा लावला होता. या कॅमेºयात बिबट्या कैद झाला आहे. त्यात तो एकटाच दिसत आहे. ‘लोकमत’ ने येथील परिसरात वाघ नसून बिबट्या असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त खरे ठरले आहे. वनविभागाकडे  तक्रार शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील तापी नदीच्या खोºयात काटेरी झुडपात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकवद येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार या भागात ३ एप्रिलपासून वन विभागाचे चार कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. तर चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून हा बिबट्या कुणालाही दिसला नाही. तसेच कॅमेºयातही कैद न झाल्यामुळे बिबट्या या भागातून गेला की काय? असे वाटत होते. मात्र, त्यानंतर वन विभागाने पुन्हा नव्याने दोन कॅमेरे बसविल्यामुळे शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास व रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेforestजंगल