साक्री तालुक्यातील जुन्या वसमार गावातील म्हसदी रस्त्यावर असणाऱ्या पाडगण शिवारात प्रकाश लोटन नेरे यांचे शेत आहे. या शेतात एका बाजूला गुरांचा वाडा आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्याने गुरांच्या वाड्यावर हल्ला केला. त्यात त्याने एका वासरीचा फडशा पाडला. सकाळी नेरे हे गुरांच्या वाड्याकडे गेल्यावर वासरी दिसत नसल्याने ही घटना लक्षात आली. यामुळे नेरे यांचे सुमारे २० हजारांचे नुकसान झाले आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश नेरे यांनी दिली. त्यावरून वनपाल एस.डी. देवरे यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. या वेळी प्रमोद नेरे, संजय नेरे व परिसरात शेतकरी उपस्थित होते. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश नेरे यांनी वनविभागाकडे केली आहे.