शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातील भांडणे येथे घरफोडी, ४० हजाराचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:09 IST

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल, चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

ठळक मुद्देसाक्री तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढभांडणे गावात व्यापाºयाच्या घरी मारला डल्लाचोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले

आॅनलाइन लोकमतधुळे : साक्री शहरासह परिसरात चोरीचे सत्र सुरूच असून, तालुक्यातील भांडणे येथील व्यापाºयाकडे चोरट्यांनी घरफोडी करून,  ४० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.भांडणे येथील नवकार नगरात प्लॉट नं. २९ मध्ये राहणारे धनंजय प्रभाकर अहिराव (३५) हे घराला कुलूप लावून माळदार गावी गेले होते. ही संधी साधत चोरट्याने ५ रोजी रात्री ८ ते ६ रोजीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ३० हजार रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची माळ, ७ हजार रूपये किंमतीचे कानातले. ३ हजार रूपयाचे सोन्याचे पान व अंगठी असा एकूण ४० हजार रूपयाचे दागिने लंपास केले. या प्रकरणी धनंजय अहिराव यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जी.व्ही. झाल्टे करीत आहेत.चोरांचा बंदोबस्त करावासाक्री तालुक्यात चोरांनी उच्छाद मांडलेला आहे. एक-दोन दिवसाआड कुठेनाकुठे घरफोडी होत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महिन्याभरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडलेल्या असून, चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले  नाही. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा