बोरगाव येथील शेतकरी अर्जुन चिंधा पाटील यांची बोरगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीचे कामकाज चंदू हिरालाल पाटील हे सांभाळत असतात. मे महिन्याच्या अखेरीस चंदू पाटील यांनी या शेतात कापूस पिकाची लागवड केली होती. या परिसरातील हे सगळ्यात चांगले कापसाचे पीक उभे राहिले होते़ एकाच झाडाला ४० ते ५० कापसाची बोंडे आली आहेत. येत्या १२ ते १५ दिवसात या कापूस झाडांवरील बोंडे फुटून त्यातून कापूस पिकाचे उत्पन्न येणार होते.
मात्र अज्ञात माथेफिरूने २४ रोजीच्या मध्यरात्री चक्क या शेतातील १०० ते १२५ झाडे उपटून फेकत मोठे नुकसान केले आहे. संबंधित शेतकरी सकाळी शेतावर गेले असतांना त्यांना कापसाचे झाडे उपटलेली दिसून आले. त्यांनी तातडीने गावातील ग्रामस्थांना कळविले़ नागरिकांनी शेतात येवून पाहणी करून आश्चर्य व्यक्त केले़ अज्ञात माथेफिरूचा शोध घेणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी अनेकांनी बोलून दाखविले़ अन्यथा काही दिवसानंतर पुन्हा अशाप्रकारची घटना घडू शकते असेही चर्चिले गेले़
यापूर्वीदेखील चंदू पाटील यांच्या शेतातील कापूस पिकाची झाडे उपटून फेकत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ गेल्या १० दिवसांपूर्वी देखील त्यांच्या शेतातील बोअरअवेलच्या पाईप फोडून नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले़
फोटो- मेलवर/फाईल पहाणे